छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयात केल दाखल

टीम महाराष्ट्र देशा : मनी लॉड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोठडीत आहे. याआधी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शनिवारी पोटाच्या विकारामुळे भुजबळांना पुन्हा जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचा आजार आहे. सकाळपासून भुजबळांवर जे जे मध्ये उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी प्रकृती बिघडल्याचे कारण देत ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता.

You might also like
Comments
Loading...