अर्जुन पुरस्कार सोहळ्याला पुजारा राहणार अनुपस्थित

pujara

वेब टीम; भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा अर्जुन पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे . नॉटिंघमशायर काउंटी क्रिकेट क्लब बरोबर असणाऱ्या करारामुळे तसेच व्यस्त शेड्युल मुळे तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही .

राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल  अर्जुन पुरस्कार देण्यात येतो . भारत सरकारने १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती . ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चेतेश्वर पुजारा, भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर,  रियो ओलिंपिकमध्ये  सुवर्णपदक विजेते मरियप्पन थंगावेलु यांच्यासह  17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे . क्रीडा क्षेत्रात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या सोहळ्यात पुजाराची अनुपस्थिती जाणवणार आहे . आज ट्वीट करत त्याने हि माहिती दिली नॉटिंघमशायर काउंटी क्रिकेट क्लब बरोबर असणाऱ्या करारामुळे तसेच व्यस्त शेड्युल मुळे तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचं पुजाराने सांगितले . हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपण आनंदी असून आतापर्यंत लाभलेल्या सहकार्याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले आहेत .