fbpx

अश्याप्रकारे पडली चेतन तुपे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या शहराध्यक्षपदी अखेर महानगरपालिका विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांची वर्णी लागली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रवादीचा पुण्याचा शहराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आज अखेर तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

१० वर्षांच्या सत्तेनंतर मागील वर्षी झालेल्या पुणे महापालिकेका निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्ष देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावेळी पालिकेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत खा. चव्हाण यांनी पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले होते.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात पक्ष संघटनेत मोठ्या खांदेपालटला सुरुवात झाली होती, या सर्व पार्श्वभूमीवर शहराला नवीन नेतृत्व देण्याची मागणी जोर पकडू लागली. यावेळी शहराध्यक्ष पदासाठी तब्बल सोळाजण इच्छुक होते. यामध्ये माजी महापौर प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे आघाडीवर होते. तसेच शहरातील काही जेष्ठ नेते देखील रेसमध्ये असल्याच चित्र होतं.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या राजकारणाची असणारी जाण, अभ्यासू, संयमी स्वभाव, सर्वसमावेश चेहरा या गोष्टी तुपे यांच्या पथ्यावर पडल्या आहेत. तसेच महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अखेर तुपे यांच्याच नावाला पसंती दिल्याचं दिसत आहे.

माढ्यातून धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा.

आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय