fbpx

बहुजन समाजील मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचा डाव – चेतन तुपे पाटील

शाळा व महाविद्यालय यांना भिकारी म्हणणाऱ्या भाजप चे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले जावडेकरांनी जे वक्तव्य केले आहे ते अतिशय लाजिरवाणे आहे त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुणे शहरात फिरु देणार नाही. हे मनुवादी प्रवृत्तीचे सरकार आहे यामुळेच अशी वक्त्यव्ये वारंवार या सरकारकडून होत आहे असे रविंद्र माळवदकर म्हणाले.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जी युनिव्हर्सिटी उपलब्ध नाही त्या जिओ युनिव्हर्सिटीला हजारो कोटी रुपये दिले आणि ज्या शिक्षण संस्था सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करतात त्यांना भिक मागायला सांगतात असा देशाचा विचित्र कारभार चालु आहे. ज्या शिक्षण संस्थामध्ये बहुजन समाजातील मुले शिक्षण घेतात त्या बंद झाल्या पाहिजेत बहुजन समाजातील मुलांनी अशिक्षित च राहीले पाहिले अशी भुमिका या जातीयवादी सरकारची आहे पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो असे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले.

यावेळी रविंद्र माळवदकर,माआ.बापु पठारे,भगवानराव साळुंखे,मा.महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक सुभाष जगताप,दिलेप बराटे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे,अल्पसंख्याक अध्यक्ष ईक्बाल शेख,विद्यार्थी अध्यक्ष रिशी परदेशी, युवती अध्यक्षा मनाली भिलारे,बाळासाहेब बोडके, निलेश निकम,बापु डाकले,उदय महाले ,प्रदीप देशमुख,रजनी पाचंगे,मिलिन्द वालवडकर,सुकेश पासलकर,नारायण गलांडे,भैय्यासाहेब जाधव ,ऑड. खुणे पाटील , फहिम शेख,दादासाहेब सांगळे , विपुल म्हैसुरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.