जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा संघर्ष रस्त्यावर आणणार – चेतन तुपे

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अध्यक्ष आपल्या दारी कार्यक्रम राबवणार

पुणे : येत्या काळामध्ये पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचा संघर्ष अधिक तीव्रतेने रस्त्यावर आणणार असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी तुपे यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता तुपे यांनी पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, पक्षामध्ये काम करणाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यालाही बळ देण्याचं तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम येत्या काळात करण्यात येईल, यासाठी अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या दारी हा कार्यक्रम राबवणार असल्याचं चेतन तुपे यांनी सांगितले.

आम्ही विरोधात असलो तरी शहराच्या विकास कामात सत्ताधाऱ्यांना मदत करू. मात्र, कुठे चुकीचं काम केलं जातं असेल तर प्रखर विरोध हा राहणारच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला !

भाजपा प्रचाराची धुरा महिलांच्या हाती

You might also like
Comments
Loading...