fbpx

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी चेतन तुपे

chetan tupe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्षपदी अखेर महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, आज पक्षाकडून अधिकृत पत्रक काढत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते, सर्वप्रथम नगरसेवक दीपक मानकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मध्यंतरी त्यांचच्यावर गुन्हा नोंद झाल्याने नवीन चेहऱ्याचा शोध घेण्यात येत होता. माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक सुभाष जगताप यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.

दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदाची निवड अधिकच लांबली होती, त्यामुळे खासदार वंदना चव्हाण यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते असेही सांगण्यात आले. मात्र, अखेर चेतन तुपे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे