बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का,’हा’ खेळाडू परतणार मायदेशी

blank

टीम महाराष्ट्र देशा- आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू डेविड विलीने वैयक्तिक कारणास्तव संघातून माघार घेतली आहे.

आज एमए चिदंबरम मैदानावर यजमान चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. काउंटी क्रिकेट क्लब वेबसाइटशी बोलताना डेविडने सांगितले की, माझी पत्नी दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे. तीची पकृती स्थिर नसल्याने माझी तिथे असणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे मी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.