‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान

चेन्नई सुपर किंग्स

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले असुन जवळपास सर्व संघाचे सराव शिबीर सुरु झाले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलची स्पर्धा ही युएईमध्ये भरवण्यात आली होती. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पर्धेचा प्रमुख संघ म्हणून समजला जाणारा संघ चेन्नई सुपर किंग्सची कामगीरी निराशाजनक राहिली होती. महेंद्र सिंग धोनीच्या नेत्रृत्वातील चेन्नई सुपरकिंग्स टीम 7व्या क्रमांकावर पोहोचली होती. त्यानंतर आता आयपीएल 2021 मध्येही चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी दावेदार मानलं जात नाहीये. त्यातच टीम इंडियाच्या तीन माजी क्रिकेटर्सने धोनीच्या नेतृत्वात असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स टीम संदर्भात मोठा दावा केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार चेन्नईच्या संघाला या सत्रातही संघर्ष करावा लागणार आहे. याचे मुख्य कारण सांगताना आकास चोप्रा म्हणाला की, चेन्नईच्या संघातील बहुतेक खेळाडू हे बऱ्याच कालावधीपासून क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्यांचा संघर्ष अटळ आहे.

गौतम गंभीर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत संवाद साधताना दावा केला आहे की, या हंगामातही चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ गाठणार नाही. असं म्हटलं आहे, संजय मांजरेकर यांचेही असेच मत आहे की, चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही.

चेन्नई सुपर किंग्सची टीम

महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डुप्लेसी, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगीडी, मिशेल सेंटनर, रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करेन, आर साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत.

महत्वाच्या बातम्या