चेन्नई सुपरकिंग्जचे फॅन्स पुण्यात दाखल, चेन्नईवरून आली खास ट्रेन

"पुणे हे आमच्यासाठी सेकंड होम"

टीम महाराष्ट्र देशा- कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन आयपीएल सामन्यांना होणारा विरोध लक्षात घेता, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने चेन्नईत होणारे सामने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईच्या संघासाठी व चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ व्यवस्थापनाने आपल्या चाहत्यांची निराशा दूर केलेली आहे.

पुण्यात शुक्रवारी होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पाहण्यासाठी खास व्हिजलपोडू एक्स्प्रेस सोडण्यात आली . आज बारा वाजण्याच्या सुमारास उत्साही प्रेक्षकांनी भरलेली हि स्पेशल ट्रेन पुण्यात दाखल झाली.चाहत्यांसाठी चेन्नई सुपर किंग्जकडून चाहत्यांसाठी खास ट्रेनची सोय केली होती. चेन्नईमधील सेंट्रल रेल्वेस्टेशनवरून पुण्याकडे रवाना झालेली ही ट्रेन आज पुणे स्थानकावर पोहोचली.

चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, तर बदली खेळाडू फाफ डु प्लेसिसच्या दिशेने एका कार्यकर्त्याने बूटही भिरकावला. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आयपीएलच्या सामन्यांना संरक्षण देण्यात आपली असहमतता दर्शवली. त्यामुळे गव्हर्निंग काउन्सिलला चेन्नईतून सामने हलवण्याचा निर्णय घ्यावा लागला. तब्ब्ल 750 हून अधिक चाहते या एक्स्प्रेसमधून पुण्यात दाखल झाले आहेत.

पुणे हे आमच्यासाठी सेकंड होम असल्यासारखं आम्हाला नेहमी वाटतं. पुणे वॉरीयर्स हा संघ आम्हाला चेन्नईचा संघ असल्याप्रमाणे आम्ही मानत होतो. आजचा सामना हा सिएसके जीकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आमची टीम कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडून विजय मिळवेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...