‘गब्बर’च्या शतकी खेळीने चेन्नईचा पुन्हा पराभव

shikhar dhavn

दुबई : यंदाच्या आयपीएल मध्ये चेन्नईच्या टीमला बराच  संघर्ष करावा लागत आहे. नुकत्याच सुरुवात झालेल्या आयपीएलला खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले. अशातच काही वैयक्तिक कारणामुळे चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला माघार घ्यावी लागली होती. तर दुसरा स्टार खेळाडू आणि फिरकीपटू हरभजन सिंग देखील यंदाच्या आयपीएल मोसमात सामील झालेला नाही. या आयपीएल मध्ये धोनीची टीम बरीच संघर्ष करताना दिसत आहे.

आयपीएलच्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची  पुढील वाटचाल आणखी खडतर होताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स सोबत कालच्या सामन्यात चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. कालच्या सामन्यात शिखर धवननं एकहाती फटकेबाजी करताना शतकी खेळी केली. शिखर धवनचे 20-20 तील पहिलं शतक झळकावलं. आयपीएलच्या या प्रवासात शिखर धवनने  39 वेळा अर्धशतकी खेळी केली.

तर काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्स संघानं पॉईंट टेबल मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे तर, चेन्नईने या आयपीएल मधील 9 मॅचपैकी 3 मॅच जिंकल्या, तर 5 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-