fbpx

चेन्नईचा सलग दुसरा विजय, अंकतालिकेत अव्वल

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्ली कॅपीटल्सचा ६ विकेट्सने पराभव केला. विजयासाठी मिळालेल्या १४८ धावांचा यशस्वी पाठलाग चेन्नईने ४ बाद १५० धावा करत केला. चेन्नईकडून शेन वॉटसनने सर्वाधिक २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तसेच महेंद्रसिंग धोनीने नाबाद ३२, सुरेश रैनाने ३० तर केदार जाधवने २७ धावांची खेळी करत विजयासाठी हातभार लावला. दिल्लीकडून अमित मिश्राने २ तर रबाडा आणि इशांत शर्माने १-१ गडी बाद केला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीकडून शिखर धवनने ५१, रिषभ पंतने २५ तर पृथ्वी शॉ ने २४ धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने ३ तर जडेजा, ताहीर आणि दिपक चाहरने १-१ गडी बाद केला. या विजयासह चेन्नईने अंकतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे