‘या’ राष्ट्रात बलात्कार करणाऱ्यास दिले जाणार नपुंसकतेचे इंजेक्शन

टीम महाराष्ट्र देशा :  भारतातचं नव्हे तर सर्व देशांमध्ये बालात्काराचे आणि लैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहेत, यावर आळा घालण्यासाठी सरकारकडून विविध शिक्षा दिल्या जातात परंतु तरीही या घटना घडत आहेत.  यावर आळा घालण्यासाठी अमेरीकेतील अलबामा या राज्याने मोठा निर्णय घेतला आहे.

अलबामा राज्यात ज्या व्यक्तीने १३ वर्षाखालील मुलांवर बलात्कार किंव्हा लैंगिक अत्याचार केल्यास आरोपीला बेलवर बाहेर सोडण्याआधी नपुंसकतेचे इंजेक्शन दिले जाणार आहे. आरोपीला जामीनवर बाहेर सोडण्याच्या एक महिना आधी हे इंजेक्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, नपुंसकतेच्या या इंजेक्शनचा प्रभाव कायमस्वरूपी नसून काही काळासाठी असणार आहे. आणि या इंजेक्शनचा संपूर्ण खर्चही आरोपी कडूनच घेतला जाणार आहे.