fbpx

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाक्षीने २४ लाख रुपये घेतले परंतु ती कार्यक्रमाला आलीच नाही अस तक्रारदारांनी म्हटले आहे. यामुळे उत्तर प्रदेशात तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हाला १३ सप्टेंबर २०१८ रोजी एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचा होता. त्यासाठी सोनाक्षीला २४ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु काही कारणांमुळे सोनाक्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे आयोजकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे या आयोजकांनी सोनाक्षीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, पोलीस सोनाक्षीचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत आले आहेत मात्र त्यांचा सोनाक्षीशी संपर्क झाला नाही. परंतु सोनाक्षीवरील सर्व आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण तिच्या मॅनेजमेंटने दिले आहे. सोनाक्षीची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.