1 एप्रिलपासून घर खरेदी करणं स्वस्त !

gst

टीम महाराष्ट्र देशा : नव्या आर्थिक वर्षात नवनव्या आर्थिक बदलांना जनतेला सामोरं जावं लागणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी समितीनं घेतलेल्या निर्णयांची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. घर खरेदी करणं स्वस्त होणार असलं तरी वाहन चालवणं अन् घरगुती सिलिंडर महागणार आहे. प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डाच्या नियमांत तीन मोठे बदल केले आहेत. तुमच्याजवळ 125 सीसीहून जास्त पॉवरची मोटारसायकल असल्यास त्यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणं देखील गरजेचं आहे.

कोणत्या सेवा होणार स्वस्त ?

घर खरेदी(जीएसटी कमी), जीवन विमा (विमा कंपन्यांनाही करावी लागणार जीएसटीच्या नव्या दराची अंमलबजावणी), कर्ज घेणे(कर्जावर लावला जाणार रेपो रेट), बुकिंग रिफंड ( रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर रेल्वे चुकल्यास तिकिटीचे पैसे परत मिळणार, ईपीएफओ ट्रान्सफर(नोकरी बदलल्यास कर्मचाऱ्यांना कोणताही अर्ज करावा लागणार नाही), प्राप्तिकर मर्यादा (वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त)

कोणत्या सेवा होणार महाग?

सीएनजी गॅस(सीएनजी गॅसच्या किमतींमध्ये 18 टक्क्यांची वाढ), कार खरेदी(वाहनांचे भाग महागणार), घरगुती गॅस(घरगुती सिलिंडरचे दर वाढणार)