देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना ‘या’ राज्यात मिळतेय स्वस्त पेट्रोल-डीझेल

fuel

नवी दिल्ली- दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचं सत्र कायम आहे. देशभरात पेट्रोलचे भाव ३५ पैशांनी तर डिझेलचे भाव ३८ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही पेट्रोलिअम कंपन्यांनी वाढ केलीय. त्यामुळे इंधनाच्या भाववाढीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

दरम्यान,देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना नागालँड राज्याने मात्र एक लक्षवेधी निर्णय घेत देशाचे लक्ष वेधले आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्याची घोषणा नागालँड सरकारने केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल आणि तत्सम इंधनावरील करामध्ये 29.80 टक्क्यावरून 25 टक्के प्रति लिटर एवढी कपात केली आहे. म्हणजेच ही कपात 18 रुपये 26 पैसे ते 16 रुपये 4 पैसे एवढी आहे, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

दरम्यान,इकडे महाराष्ट्रात मुंबईत 1 मार्चपासून काळ्या-पिवळ्या, रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात किमान तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सोमवारी घेतला. त्यामुळे इंधन दारवाढीमुळे होरपाळणाऱ्याना आणखी एक चटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या