दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात

uddhav thakre

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी केली आहे. छावा संघटनेने दुध आंदोलनात सहभागी होत दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव म्हणाले, सध्या स्थितीमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केलं जातं आहे.

जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनत पाहतां हा अन्याय आहे. मुख्यमंत्री महोदय मायबाप आता यातुन मार्ग काढा शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन तुम्हांला आज मी दुधात ठेवून हि मागणी करत आहे असे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री यांना विडीओ द्वारे ट्वीट केले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला

मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण