‘चौकीदार चोर है’ म्हणणाऱ्या राहुल गांधींवर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की

rahul and modi

टीम महाराष्ट्र देशा- ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलंय, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली होती. या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं दिले होते अखेर राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’वरून सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या दाव्यावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत 22 एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. ‘निवडणुकीच्या धामधुमीत मी ते वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी ?

Loading...

चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे.मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती.