सप्तशृंगी मातेच्या दर्शनापासून भावीक राहणार चार दिवस वंचित

नाशिक  साडेतीन शक्तिपीठांपैकी ंअर्धे पीठ असलेल्या वणी येथील श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी मोठी दरड कोसळली. मात्र मंदिरावर लावण्यात आलेल्या मोठ्या जाळ्यांमुळे मोठमोठे दगड या संरक्षण जाळ्यांमध्ये अडकून पडले आहेत. यामुळे मंदिराला धोका नसला तरी हे दगड काढणे आवश्यक आहे.
यासाठी 17 जूनपासून हे काम संबंधित कंपनीमार्फत हाती घेण्यात येत असून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रशासनाला देण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली असून दि. 17 ते 21 जून असे चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
bagdure
सोमवारी सायंकाळच्या सुमारास वणी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिरावरील बाजूने एक मोठा दगड कोसळला. सुमारे पाचशे किलो वजनाचा हा दगड असून हा दगड मंदिरावरील संरक्षक जाळीमुळे तेथेच अडकून पडला आहे.
ही संरक्षक जाळी नसती तर दरड सरळ मंदिराच्या परिसरात कोसळली असती व मंदिराची मोठ्या प्रमाणात हानी झाली असती. या घटनेनंतर संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानुसार 17 जूनपासून हे काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र काम सुरू असताना कोणतीही अप्रिय घटना घटना घडू नये याकरिता मंदिर बंद ठेवण्यासंदर्भातील पत्र सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मान्य केला असून 17 जूनपासून या कामास सुरुवात होणार आहे.
You might also like
Comments
Loading...