स्टेचू ऑफ लिबर्टी होऊ शकतो मग शिवस्मारक का नाही?; उदयनराजेंचा राज ठाकरेंना सवाल

राज ठाकरे

दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केल होते. अरबी समुद्रातील स्मारक म्हणजे सरकारने दाखवलेले स्वप्न असून ते कधीच पूर्ण होणार नासल्याच राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या विधानानंतर आता डोक्यातून नव्हे तर हृदयातून करायचे ठरवले तर स्टेचू ऑफ लिबर्टी होऊ शकतो मग शिवस्मारक का होणार नाही असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे माझे मित्र आहेत. ते कोणत्या अँगलने बोलले हे माहीत नाही. मात्र आपण सारे लोकशाहीतील राजे आहोत त्यामुळे स्मारक होईलच असेही उदयनराजे म्हणाले आहेत.