fbpx

छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना

टीम महाराष्ट्र देशा- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मंगळवारी ट्विटर इंडियाच्या टॉप ट्रेंडलिस्टमध्ये झळकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अनेक लोकांकडून मोठ्याप्रमाणावर ट्विट केली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये आहे. सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

याशिवाय, अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे.