मराठा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीराजे सरसावले; मेडिकल प्रवेशाबाबत सरकारशी चर्चा करणार

Sambhaji Raje Bhosale

टीम महाराष्ट्र देशा :  नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मराठा विध्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आजाद मैदानात दाखल झाले.

यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी ‘आपण सरकारशी चर्चा करुन या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार’ असल्याचं आश्वासन दिले आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या याचिकेबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला होता. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती. त्यामुळे मराठा विधार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी मराठा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती, त्यात तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे.