तुळापुर: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रद्द

sambhaji maharaj tulapur

पुणे – शिवपूत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रद्द करण्यात आला आहे . यंदा या कार्यक्रमाचं 5 वे वर्ष होते .16 जानेवारी रोजी हा सोहळा तुळापुर या ठिकाणी पार पडणार होता मात्र 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्यापार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यंदाचा सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

शिवपूत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टने यासंदर्भात निवेदन काढून माहिती दिली आहे . राज्याभिषेकाच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हा कार्यक्रम स्थगित करीत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

sambhaji raje