विनोद तावडे यांनी शिक्षण विभागात ‘विनोद’ करायचं सोडाव- छात्रभारती

पुणे – तावडे यांनी समाजवादाची व्याख्या सांगावी आणि शिक्षण विभागात विनोद करणं सोडून द्यावं. सरकारला राज्यातील तेराशे नाही तर तेरा हजार शाळा बंद करून खासगी भांडवलदारांना देयच्या आहेत असा गंभीर आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

राज्यातील तेराशे शाळा बंद करताना पटसंख्या व ढासळता शैक्षणिक दर्जा ही कारणे राज्य सरकारने सांगितली आहेत. मग मागील ३ वर्षापासुन पटसंख्या वाढविण्यासाठी व दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पावले सरकारने उचललेले दिसत नाही, सरकारी शाळा बंद केल्याने खाजगी शाळामध्ये पालकांना आर्थिक भुर्दंड बसणाची चिन्ह दिसत असल्याची चिंता यावेळी छात्रभारतीचे राज्यध्यक्ष दत्ता ढगे यांनी व्यक्त केली.