सेन्सॉर बोर्ड झोपलंय का, शिवाजी महाराजांच्या नावाच्या एकेरी उल्लेखावरून संभाजीराजे आक्रमक 

टीम महाराष्ट्र देशा –  ‘कौन बनेगा करोडपती’ हा सोनी टीव्हीवरील सर्वात चर्चेत असणारा कार्यक्रमअसून बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. मात्र आता ‘कौन बनेगा करोडपती’चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली आहे.

याविषयी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, केबीसी आणि सोनी टी व्ही ला आवाहन करतो, की आपण महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. अमिताभ बच्चनछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घेण्याइतपत आपण मोठे नाही आहात. परंतु देशात आजघडीला तुमच्या एकेक शब्दाला महत्व आहे, कारण लोक तुमचं ऐकतात.

तुम्हीच जर असे बोलत राहिलात, तर महाराष्ट्राबाहेरचे लोकही तसाच उच्चार करतील. लोकांना हेच वाटत राहील, की महाराजांना केवळ शिवाजी म्हणलं तरी चालतं. नकळत त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या जात राहतील. त्याचे सगळ्यात मोठे अपराधी तुमच्यासारखे लोक राहतील.अश्यावेळी सेन्सॉर बोर्ड नेमकं झोपी जातंय का? त्यांनी का आक्षेप घेतला नाही? कार्यक्रम प्रदर्शित होण्याआधीच बारकावे तपासले गेले पाहिजेत.

अशा प्रकरच्या गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक अस्वस्थता निर्माण होईल, याची माहिती त्यांना ही असली पाहिजे. त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सरकारने ही असा अध्यादेश काढला पाहिजे की, कोणत्याही महापुरुषांचा अफमानकारक उल्लेख कुणीही करू नये, तसे करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या