इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहूनी गुजरातमध्ये चालविला चरखा

अहमदाबाद : इस्राईलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आणि पत्नी सारा नेतन्याहू हे सध्या भारत दौऱ्यावर आले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अहमदाबाद एअरपोर्टवर स्वागत करण्यात आलं आहे. आज एअरपोर्ट ते साबरमती मोदींचा रोड शो होता.

नेतन्याहू आणि मोदी यांनी साबरमती येथं जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्घांजलीही वाहिली. त्यानंतर मोदी, नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने पतंग बाजीचा आनंद लुटला तसेच चरखा चालविला. महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर नेतन्याहू आय क्रिएशन या स्टार्ट अप प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

You might also like
Comments
Loading...