fbpx

‘एमआरपी’वर जीएसटी आकारणे बेकायदा

Charging GST on 'MRP' illegal

औरंगाबाद:- ‘एमआरपी’ वर जीएसटी आकारणे बेकायदा असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाचे , संयुक्त आयुक्त अशोक कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ग्राहकांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे जीसटी म्हणून कुणी आकारत असल्यास देवू नये असे ते म्हणाले.

मराठवाडयात या पंधरवाडयात मंथन जीएसटी जागरूक मोहिम आयोजित करण्यात आली असून व्यापारी व ग्राहकांत जीएसटी बाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना फळे, भाज्या या वस्तूवर जीएसटी शुल्क आकारले जात नाही. फक्‍त या वस्तू ब्रँंडेड ट्रेडमार्क असलेल्या असल्या तर त्यावर जीएसटी आहे.

तसेच दुकानदारांनी विविध वस्तुंच्या जीएसटी पूर्व आणि जीएसटी नंतरच्या दरांची तुलनात्मक यादी दर्शविली पाहिजे असे त्यांनी सांगितले. वस्तूंच्या एमआरपीमध्ये सर्व कर समाविष्ट असल्याने एमआरपीवर किंवा त्या पेक्षा जास्त जीएसटी कर आकारणे बेकायदा असून ग्राहक किंवा व्यापारी या बाबत केंव्हाही जीएसटी कार्यालयात येवून अधिक माहिती घेवू शकतात असे ते म्हणाले या वेळी एस. व्ही. देशमुख . राजुरकर व गुप्‍ता उपस्थित होते.

जीएसटी हे एक देश एक कर या बाबत महत्वाचे पाउुल असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत असे ते म्हणाले.