‘हलाला’चा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

halaala

नवी-दिल्ली : आपल्या अगोदरच्या पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यासाठी एमआयएमचे माजी नेते रियाझुद्दीन यांनी आपल्या मित्राला सोबत नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी रियाझुद्दीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एमआयएम नेत्याविरोधात विनयभंग आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हादेखील दाखल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला जामिया नगरमध्ये आपल्या मुलासह वास्तव्यास होती. २०१२ मध्ये तिने पहिल्या पतीचा तोच मित्र फरियादसोबत लग्न केले होते. त्यानेदेखील महिलेला तिहेरी तलाक देत लग्न मोडले होते. नऊ वर्षांनी रियाझुद्दीने आपल्या त्या मित्रासोबत पत्नीच्या घऱी पोहोचले. पुन्हा एकदा तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी आपलाच मित्र आणि महिलेच्या दुसऱ्या पतीकडून हलालाचा प्रयत्न केला. रियाझुद्दीन यांनी जर तिने हलाला प्रथा पार पाडली तर आपण पुन्हा लग्न कऱण्यास तयार असल्याचे म्हटले. यावेळी तिने नकार दिला असता मारहाण केली, तसेच तिचे कपडेही फाडल्याची कबुली आरोपीने दिली आहे. तसेच महिलेने आरोपी पती उत्तर प्रदेशात एमआयएमचा सचिव असल्याचे सांगितले असून आपल्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देत होता असाही आरोप केला आहे.

दरम्यान, ‘हलाला’ ही प्रथा त्या घटस्फोटित महिलांसाठी आहे ज्यांना परिस्थितीमुळे पुन्हा एकदा आपल्या पहिल्या पतीसोबत लग्न कऱण्याची इच्छा आहे. यासाठी त्यांनी हलालाचे पालन करावे लागते. प्रथेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला असेल तर तो तोपर्यंत तिच्याशी पुनर्विवाह करु शकत नाही जोपर्यंत ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न म्हणजेच निकाह करुन घटस्फोट घेत नाही.

महत्वाच्या बातम्या