पोलीस कार्यालय तोडफोड: भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांसह 119 जणांविरोधात आरोपपत्र

शिवाजी कर्डिले

टीम महाराष्ट्र देशा : नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह 119 आरोपींविरुद्ध येथील न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी याची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

नगर येथे केडगाव दुहेरी हत्याकांड झाले होते. त्याच वेळेला रात्रीच्या सुमाराला आमदार संग्राम जगताप यांची प्राथमिक चौकशी येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये सुरू होती. याच दरम्यान, जगताप समर्थकांनी या ठिकाणी येऊन जगताप यांना का ताब्यात घेतले, असा जाब विचारून येथील कार्यालयाची मोडतोड केली होती व सर्वत्र एकच पळापळ झाली होती. त्यानंतर पोलिसांनी शहरात अधिक गस्त वाढवून यातील काही आरोपींना ओळखून त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती.