‘चारधाम यात्रा उद्यापासून होणार सुरू’, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा

chardham yatra

उत्तराखंड : कोरोना संक्रमणामुळे चार धामच्या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यावर्षी उत्तराखंड हायकोर्टाने चार धाम यात्रेवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे दर्शनासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. उत्तराखंडमधील चार धाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय रद्द केला आहे. यामध्ये कोरोना संबंधी नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज(१७ सप्टें.) उद्यापासून (१८ सप्टेंबर) ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, चारधाममधील मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात येणाऱ्या निर्बंधांसोबत ही यात्रा सुरू होईल, असे मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले आहे. तसेच कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र यात्रेकरूंसाठी अनिवार्य राहील, असेही न्यायालय म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या