‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’

टीम महाराष्ट्र देशा :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील बऱ्याच जणांना भाजपात यायचे आहे परंतु तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत, असे वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी चंद्रकात पाटलांना काही ना काही बोलायची सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते, अशी टीका केली होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे, पण उमेदवार घेताना तावूनसुलाखून घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत, असे पाटील यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर मी पाच जिल्ह्यांची निवडणूक लढतो, पवार कधी लढलेत आहेत का.? पण माझे वैशिष्ट्य आहे की मी कधीच कुणावर उचकत नाही. त्यामुळे अजित पवारांना काय बोलायचे ते बोलू द्या, असेही पाटील यांनी म्हंटले.