यूझर्सच्या सुरक्षेसाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार बदल

गुगल प्ले स्टोअर

नवी दिल्ली: इंटरनेट ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन अद्ययावत सेवा आणणारे गुगल आता यूझर्सच्या सुरक्षेवरुन अधिक सतर्क झाले आहे. यामध्ये आता गुगलने प्ले स्टोअरमध्ये अनेक बदल करण्याची घोषणा केली आहे. जेणे करून ग्राहकांना सुरक्षित सेवा मिळू शकतील.

या पार्श्वभमीवर गुगलने गुगलने आपली डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसी अपडेट केली आहे. या अपडेट अंतर्गत, फोनमधील उपलब्ध अॅपला दुसर्या अ;ॅपचा एक्सेस करण्याची परवानगी दिली जात नाही. कारण गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप इंस्टाॅल केल्यानंतर त्या अॅपला आपल्या अँड्राॅइड डिवाईसमधील अनेक परवानगी द्यावा लागतात. त्यामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती असते.

मात्र आता गुगलने यावर पर्याय शोधला असून त्यामुळे अॅप डाऊनलोड केल्यानंतर मागण्यात येणाऱ्या परवानग्या का गरजेच्या आहेत, या बाबतची ठोस आणि तर्कसंगत माहिती आता या अॅपच्या कंपन्यांना द्यावी लागणार आहे. तर ५ मे पासून हे नियम लागू होतील तसेच युजर्सची हेरगिरी करणारे सर्व अॅप्स 5 मे 2021 पासून बंद करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या