मराठा क्रांती मोर्च्यासाठी हे असतील वाहतुकीतील बदल

maratha-morcha

पुणे : बुधवारी ( ९ ऑगस्ट ) रोजी मुंबई मध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी लाखोंच्या संखेने मराठा समाज एकवटणार आहे. पुणे मार्गे मुंबई ला जाणारी अधिक असणार आहे, त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत . दि. 8 ऑगस्ट रोजी पुण्याकडे येणारी वाहने कोल्हापूर-सोलापूर-सातारा-पुणे-मुंबई या मार्गाने मुंबईला जाणार आहेत. तसेच ते 10 ऑगस्ट रोजी मोर्चा संपल्यानंतर वाहने पुन्हा पुण्याकडे येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे आहेत.

सोलापूर रस्त्याने येणार्‍या वाहनांनी हडपसर-गाडीतळ येथून कोंढवा-कात्रज बायपासवरून बंगळूर-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जावे.

सातारा रस्त्यावरून येणार्‍या वाहनांनी बंगळूर- मुंबई महामार्गावरून मुंबईकडे जावे.

नगर रस्त्याने येणार्‍या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकण असे किंवा या मार्गाने न गेलेल्या वाहनांनी शहरात वाघोली, येरवडा, होळकर पूल येथून बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईकडे जावे.