आजपासून आर्थिक क्षेत्रात होणार हे बदल; जाणून घ्या काय आहेत हे नवे बदल

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून म्हणजेच एक ऑक्टोबरपासून आर्थिक विषयाशी निगडीत अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावरही पडण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये स्टेट बँकेचे बदलणारे नियम, कॉर्पोरेट करातील कपात, विविध वस्तूंवरील नेमका किती जीएसटी भरावा लागणार आदी निर्णयांचा समावेश आहे. याशिवाय कोणत्या निर्णयाचा फायदा होणार आणि कोणत्या निर्णयाचा तोटा होणारआहे. याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

ऑनलाईन बँकिंग व्यवहारावरील मर्यादा रद्द होणार : स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग व्यवहारांवरील मासिक मर्यादा पूर्णपणे रद्द केली आहे. दरमहा खात्यामध्ये किमान २५,००० रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या शाखेतून दोनवेळा तर दरमहा खात्यामध्ये किमान २५,००० ते ५०,००० रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या शाखेतून १० वेळा मोफत रक्कम काढता येणार आहे. खात्यामध्ये ५०,००० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम शिलकीत ठेवणाऱ्या ग्राहकास अमर्यादवेळा रक्कम काढता येणार आहे.

Loading...

पेट्रोलपंपांवर मिळणारी कॅशबॅक बंद होणार : देशभरातील पेट्रोलपंपांवर डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा ई-वॉलेटच्या माध्यमातून इंधनच्या खरेदीवर मिळणारी ०.७५ %ची सवलत बंद होणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती.

कॉर्पोरेट करातील कपातीत होणार फायदा : आजपासून स्थापन होणाऱ्या कंपन्यांना सरकारने किमान १५ टक्के कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या कंपन्यांना उपकरासह एकूण १७.०१ टक्के कर भरावा लागणार आहे. जेणेकरून केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीचा फायदा मिळणार आहे.

पेन्शन पॉलिसीत बदल होणार : दहा वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वीच ज्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल आणि ज्यांनी १ ऑक्टोबर पूर्वी सलग सात वर्षे सेवा केली असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना १ ऑक्टोबर २०१९पासून उपनियम (३) अंतर्गत वाढलेल्या दराप्रमाणे पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हॉटेलच्या खोल्या स्वस्त होणार : ज्या हॉटेलच्या खोल्यांचे भाडे १००० रुपये आहे. जीएसटी परिषदने त्या हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी शून्यावर आणला आहे. तसेच १००१ रुपये ते ७,५०० रुपये भाडे असणाऱ्या खोल्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला आहे.

जीएसटी अर्जात बदल – पाच कोटी रुपयांची वार्षिक आर्थिक उपाढाल असणाऱ्या व्यावसायिकांना आजपासून नवीन जीएसटी परतावा भरावा लागणार आहे. जीएसटीआर १ या अर्जाऐवजी आता या व्यावसायिकांना ‘जीएसटीएएनएक्स-१’ हा अर्ज भरावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे