CBSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये बदल; घ्या जाणून सुधारित वेळापत्रक!

exams

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या परीक्षा या लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारी CBSE बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्याचे सांगितले होते. आता, जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

दहावीच्या कोणत्या विषयांची तारीख बदलली ?

10 वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा 21 मेच्या जागी 2 जून रोजी होणार आहे. तर Frenchची परीक्षा 13 मे रोजी होणारी परीक्षा आता 12 मे रोजी घेतली जाईल. तसेच, विज्ञान विषयाची परीक्षा 15 मे ऐवजी 21 मे रोजी होणार आहे, तर संस्कृत विषयाची 2 जून रोजी होणारी परीक्षा 3 जून रोजी घेण्यात येईल. बोर्डाने बदल केलेलं वेळापत्रक पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

बारावीच्या कोणत्या विषयांची तारीख बदलली ?

12 वीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स विषयाची परीक्षा 13 मे रोजी होणारी परीक्षा आता 8 जून रोजी होईल. तसेच, गणित विषयाची 1 जूनला होणारी परीक्षा 31 मे रोजी घेण्यात येईल. भूगोल विषयाची परीक्षा 2 जून ऐवजी 3 जून रोजी तर Web application ची परीक्षा 3 जून ऐवजी 2 जूनला घेतली जाईल. बारावीचे सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

महत्वाच्या बातम्या