वस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar

मुंबई : वस्तू व सेवाकराच्‍या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍यांपर्यंत कमी करण्‍यात आला आहे. 13 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यावरुन 12 टक्‍के करण्‍यात आले आहे, 6 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यावरुन 5 टक्‍के करण्‍यात आले आहे, 8 वस्तूंचे दर 12 टक्‍क्‍यावरुन 5 टक्‍के करण्‍यात आले आहे, तर 6 वस्तू 5 टक्‍क्‍यावरुन कर मुक्‍त करण्‍यात आल्‍या आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अभिनंदनीय असून या माध्‍यमातून सरकारने लोकहित जपले असल्‍याची प्रतिक्रिया अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

हा सुधारित जीएसटी 15 नोव्‍हेंबरपासून लागू होणार असून सुमारे 200 वस्तूंवरील कर कमी होणार आहे. 28 टक्‍यावरुन 18 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू चॉकलेट, टुथपेस्‍ट, च्‍युइंग गम, शॅम्पू, पॉलिश, ग्रॅनाइट, मार्बल, सौंदर्य प्रसाधने, न्‍युट्रिशनल ड्रिंक, शेव्हिंग क्रीम आणि लोशन, पेंटस, सिमेंट, वॉशिंग मशिन, एसी, अग्निरोधक, घडयाळ, ब्‍लेड, स्‍टोव्‍ह, मॅट्रेस, वायर, केबलस्, इन्‍स्‍युलेडेट कन्‍डक्‍टर्स, इलेक्ट्रिकल इन्‍स्‍युलेटर्स, इलेक्‍ट्रील्‍स प्‍लग, स्विचेस, सॉकेटस, फ्युजेस, रिलेज, इलेक्‍ट्रीकल कनेक्‍टर्स, इलेक्‍ट्रीकल बोर्ड, पॅनल्‍स, कॅबिनेटस, फायबर बोर्डस् आणि प्‍लायवुड, लाकडी वस्तू, लाकडी फ्रेम, पेव्‍हींग ब्‍लॉक, फर्निचर, ट्रंक, सुटकेस, प्रवासी बॅग्‍ज, डिटरजेंटस्, शॅम्‍पु, हेअर ड्रायर, परफ्युम, फॅन, पम्‍पस्, कॉम्‍प्रेसर, लाईट आणि इलेक्‍ट्रीक फिटींग साहीत्‍य, बॅटरीज, सॅनिटरी, प्‍लास्‍टीकचे साहीत्‍य, सेरॅमिक टाईल्‍स, वॅक्‍युम फ्लकस्, लार्इटर्स, प्रिंटींग कॉरट्रीज, अॅल्‍युमिनियमची खिडकी, वॉलपेपर, काचेच्‍या वस्तू, अग्निशमन, बुलडोजर, रोड रोलर्स, इलेक्‍ट्रीक जीना, कुलिंग टॉवर, रेडिओ टेलिव्हिजन, म्‍युझिकल इनस्ट्रुमेंट, रबरी साहीत्‍य, चष्‍मे, दुर्बिन, कॅमेरा व

अन्‍य. 28 टक्‍यावरुन 12 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू मिक्‍सर ग्राइंडरचे साहीत्‍य, टँक आणि बख्‍तरबंद गाडीचे साहीत्‍य 18 टक्‍यावरुन 12 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू दुग्‍धजन्‍य पदार्थ, साखर, पास्‍ता, सुगर फ्रि, प्रिटींग इंक, ज्‍युट आणि कॉटनच्‍या हॅन्‍ड बॅग आणि शॉपिंग बॅग, कृषि विषयक साहीत्‍य, शेव्हिंग मशिनचे साहीत्‍य, बांबु आणि केन यापासुन तयार केलेले फर्निचर व अन्‍य. 18 टक्‍यावरुन 5 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू शेंगदाना चिक्‍की, रेवडी, आलु चिप्‍स, चटणी पावडर, फ्लाय अॅश व

अन्‍य 12 टक्‍यावरुन 5 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू नारळ, इडली, डोसा, बटर, फिनिश लेदर, फिशिंग नेट आणि हुक, गरम कपडे, सिमेंटच्‍या विटा व अन्‍य 5 टक्‍यावरुन 0 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू पॉप कॉर्न, ड्राईड व्हेजीटेबल, खोब्रा, खांडसरी साखर, बांगडया, लाखेच्‍या बांगडया व अन्‍य. रेस्टॉरेंटमधील जेवण स्वस्त एसी आणि साध्या रेस्टॉरंटमधील जीएसटीमधील तफावत दूर करत परिषदेने एकच दर निश्चित केला आहे. यामुळे ग्राहकांना आता हॉटेलमधील बिलांवर 5 टक्के कर द्यावा लागेल. यापूर्वी साध्या हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारला जात होता.