पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवून प्रस्तावावर लवकर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.

Rohan Deshmukh

‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आता पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

‘पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचा अर्थात जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे. जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं. 1630 मध्ये विजापूरच्या आदिलशाहने पुणे शहराची लूट केली, त्यावेळी भीतीमुळे तिथे कोणीही राहण्यास धजावत नव्हतं. पुणे आता ज्या स्थितीत आहे, ते जिजाऊंच्या योगदानामुळे, ते कोणीही विसरु शकणार नाही,’ असं संतोष शिंदे यांनी सांगितलं.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...