‘पालकमंत्री बदला, सांगलीला वाचवा’, निलेश राणेंचा जयंत पाटलांविरोधात नारा

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थिती आद्यपही कायम आहे. त्यामुळे व्यापार ठप्प झालेले आहे. कोरोनामुळे व्यापारी हतबल झालेले आहे. जिल्ह्यात कोरोना नियमात शितीलता देण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे. अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे घेताना दिसत आहेत. एकीकडे सामान्य नागरिकांना निर्बंधाच्या नावाखाली वेठीस धरत आहेत तर दुसरीकडे जयंत पाटील मात्र गर्दी होणारे कार्यक्रम करताना दिसत आहेत.

यावर भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हटले की, ‘सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता कोरोना आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्याने काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा.’

दरम्यान, सांगली जिल्ह्यात रुग्णदर १० टक्के इतका आहे. तसेच रुग्ण संख्या वाढत आहे. व्यापार्यांकडून पुन्हा व्यापार सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे टो भाग वगळता इतर ठिकाणी व्यापार करण्यास मुभा द्यावी अशी मागणी व्यापारी करत आहे. जयंत पाटील यांचा ही या मागण्यांना समर्थन आहे. मात्र, निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP