राज ठाकरेंच्या भूमिकेत बदल, आता सत्ता नको विरोधी बाकावर बसण्याची संधी द्या !

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सांताक्रूझ येते विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याची मागणी केली. जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होणार नाही तो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असे आवाहन केले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, दिवसेंदिवस शहरांचा विचका होत आहे. मात्र सरकारला काहीही पडलेली नाही. विरोधी पक्षही हतबल आहेत. कारण विरोधी पक्ष नेतेचं भाजपात पळाले आहेत. देशात बँक घोटाळे होत् आहेत, हक्काचे पैसे मिळत नाही. माणस रडतायत तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडत नाही. कारण बँकेच्या अधिकार पदावर भाजपचीचं माणस आहेत. आज शेतकरी आणि कामगार ओरडतायत , विद्यार्थी ओरडतायत, मात्र राजकीय पक्ष आणि सत्ताधारी केवळ जाहीरनामे देतायत. सरकारं येत्यात आणि जात्यात मात्र आपण काहीही जाब विचारत नाही. आज राज्याची एवढी दुर्दशा झाली, तरी मतदार म्हणून तुमच्या जाणीवा मेल्या आहेत का ? जाब कधी विचारणार, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी विचारला.

मी या विधानाभेला तुमच्याकडे वेगळी भूमिका मांडायला आलोय. या राज्याला सर्वार्थाने कुणा समोरही न झुकणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे. मी विरोधी पक्षाची मागणी करायला आलोय. प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर तुमच्या मागण्या मान्यचं होणार नाहीत . कारण विरोधी पक्षाचेचं आमदार तुमच्या मागण्या पूर्ण करू शकतात. आज सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे. माझ्या हाती विरोधी पक्षाची सत्ता द्या. माझ्या उमेदवारात सरकारला जाब विचारण्याची आग आहे. सरकारकडून कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे आता एक प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या