पाकिस्तानात 4 महिने जेलमध्ये काढणाऱ्या भारतीय जवानाला भारतात सुद्धा शिक्षा.

भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी धरण्यात आलं आहे.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानवर 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला भारतीय जवान चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. मात्र भारत सरकारने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आणि चंदू चव्हाण यांना 21 जानेवारीला भारतात आणलं.
परंतु , आता पाकिस्तानात 4 महिने नरकयातना भोगल्यानंतर चंदू चव्हाण यांना भारतात सुद्धा 3 महिने जेल मध्ये राहावं लागणार आहे.

नजरचुकीने पाकिस्तानात गेलेल्या या जवानाला भारताच्या लष्करी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी धरण्यात आलं आहे.न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली असली, तरी त्यावर अंतिम शिक्कमोर्तब होणं बाकी आहे. संबंधित अधिकारी/कार्यालय या शिक्षेचा कालावधी कमी-जास्त करुन, शिक्षेला अंतिम रुप देतील.

You might also like
Comments
Loading...