fbpx

पक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत आहेत. तर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे. या पक्षाच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील यांनी पक्ष श्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांचे आभार मानले आहेत.

तसेच पक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना राज्याच्या राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने भाजप श्रेष्ठींकडून राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली आहे. सध्या चंद्रकांत पाटील राज्याचे महसूल खात सांभाळत आहेत. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेलं महसूल खातं चंद्रकांत पाटील सांभाळत असले तरी आता पर्यंत ते निष्कलंक आहेत. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष पदी आणल्याच भाजप नेत्यांकडून सांगितल जात आहे.