दरेकर म्हणाले, ‘राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष’, आता चंद्रकांतदादा म्हणाले….

pravin darekar

पुणे – काल शिरुरमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर भाजपची मात्र चांगलीच गोची झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दरेकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सारवासारव केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

प्रविण दरेकर जे वाक्य बोलले ते बोलीभाषेत वापरलं जातं. त्याचा एवढा इश्यू करण्याची गरज नाही. आपण दररोजच्या बोलण्यात वाक्यप्रचार वापरत असतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करु नये. त्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नये. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता.दरेकरांच्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीला श्रीमंतांचा पक्ष म्हणत गोरगरिबांची कीव वाटत नसल्याचं म्हटलं.

राष्ट्रवादी पक्ष कसा श्रीमंतांचा, सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा, हे दरेकरांनी भाषणात सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन तो वाक्यप्रचार वापरला. त्यात एवढा इश्श्यू करण्यासारखं काही नाही. राष्ट्रवादीला श्रीमंतचं जवळचे वाटतात गरिब नाही, असा निशाणा साधत प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता तो काढण्याचा कुणी प्रयत्न करु नये.

महत्वाच्या बातम्या