fbpx

सुळेंंच्या अडचणी वाढणार, चंद्रकांत पाटील बारामतीत शेवटचे तीन दिवस ठिय्या मांडणार

पुणे : वडगाव बुद्रुक येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ‘मैं भी चौकीदार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विजयाची गुढी उभारून विजयाचे रणशिंग फुंकले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. बारामती मध्ये लीड मिळाल्याने जानकर पडले त्यामुळे मी स्वतः बारामतीत शेवटी तीन दिवस थांबणार आहे. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्या मध्ये आहे असं म्हणत आघाडीवर तोफ डागली.

विजय शिवतारेंची फटकेबाजी

आपल्या छोट्याशा भाषणात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी देखील राष्ट्रवादीवर हल्लबोल केला. या निवडणुकीचा धसका घेऊन स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गल्लीतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रत्येकाने या निवडणुकीत आपआपली जबाबदारी पार पाडली तर राष्ट्रवादीची ही कीड संपेल . ही निवडणूक जगन्नाथाचा रथ असून हा रथ प्रत्येकाने पुढे नेला पाहिजे असे ते म्हणाले.