मराठा आंदोलन पेटवणाऱ्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती आहे. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलं आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत मराठा आंदोलनातील हिंसाचारावर त्यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान यापूर्वी,काही पेड लोकं आंदोलनात घुसले असून आंदोलन करून गाड्या फोडून काय साध्य होणार आहे? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेल का ? असा देखील सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र आता आक्रमक झालेलं आंदोलन पाहून चंद्रकांत पाटील यांनी आपला सूर नरम केला आणि मी हातापाय पडतो पण आंदोलन मागे घ्या असं म्हणत माफी मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

आरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे