fbpx

चंद्रकांतदादा म्हणतात, यापुढे सरकारी नोकरीचा विचारचं डोक्यातून काढून टाका

टीम महाराष्ट्र देशा : सुशिक्षितांची संख्या वाढत असताना सरकारी नोकऱ्या मात्र कमी होत आहेत. त्यामुळे यापुढे सरकारी नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाका. उद्योगाची सुरूवात करून स्वतः नोकऱ्यानिर्माण करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महापालिका आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरू करावेत. नवीन कामगार कायद्यामुळे तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही. बचतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्या. वर्षाला वीस हजार पेक्षा कमी सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उद्योगामुळे रोजगार वाढले तर गुन्हेगारी कमी होईल.

शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत महापालिकेतर्फे हा उपक्रम राबवला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटांना आणि वैयक्तिक लाभार्थ्याना कर्ज देणाऱ्या बँकाचा सन्मान करण्यात आला. चारस्तरीय संघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे दोन लाखाचे धनादेश देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे 26 बचत गटांना 2लाख 60हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले.