मी टोपी फेकायचे काम केले, ती विश्वजीत कदमांना बसली : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरु आहे. याविषयी भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे अस विधान केले होते. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Loading...

चंद्रकांत पाटील यांनी ‘मी टोपी फेकायचे काम केले, ती ज्यांना बसली. त्यांनीच त्याचा खुलासा केला’ अस विधान केले. तसेच पुढे बोलताना माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. दोन्ही काँग्रेसची मंडळी अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांना तुम्ही थांबवा. ज्यांना आपले काय होणार अशी भीती वाटते, असे लोक भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. हसन मुश्रीफ भाजपामध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे. अल्पसंख्याक समाजातील अत्यंत सहृदयी माणूस आहे. त्यांनी रुग्णसेवा प्रचंड केली आहे. राष्ट्रवादीत राहिले तर त्यांना भवितव्य नाही. कारण पाच वर्षे त्यांचे सरकार काय पुन्हा सत्तेत येणार नाही. तोपर्यंत ते म्हातारे होतील असा टोला पाटील यांनी लगावला.

दरम्यान, पुढे बोलताना मुळात मी महत्वाकांक्षी अजिबात नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून मुख्यमंत्री होतोच असेही काही नाही, अस चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.







Loading…










Loading…

Loading...