fbpx

जयंत पाटील यांना ‘नाचता येईना अंगण वाकड’ : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनी भाजपमध्ये पक्षांतार केले आहे. त्यामुळे भाजपच्या या फ्री इनकमिंग धोरणामुळे अनेक राष्ट्रवादीचे नेते त्रस्त झाले असून भाजपवर टीका करत आहेत. अशाच एका टीकेचा समाचार राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आहे. आज सांगली येथील सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ‘नाचता येईना अंगण वाकड’ अशी उपमा दिली आहे.

आज सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी पत्रकार परिषदे दरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी ही टोले बाजी केली.

यावेळी पाटील म्हणाले की, जयंतरावांनी आमच्यावर टिका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते-नेते सांभाळावेत. अन्यथा तुम्हाला तुमच्या दोन्ही बाजुचे कार्यकर्तेही भविष्यात शोधावे लागतील. तसेच आघाडीचे नेते म्हणून राज्यभर मिरवतात मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात लोकसभेसाठी उमेदवारही मिळवता आली नाही. आता त्यांनाही जागा स्वाभिमानीला सोडायची वेळ आली आहे.असा घणाघात देखील पाटील यांनी यावेळी केला.