लेकीसाठी नातवाला मावळात ढकललं, चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. याच दरम्यान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कांचन कुल यांच्या प्रचारासाठी ते बारामती लोकसभा मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

भाजपच्या बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील चौफुला येथे आहे होते. त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले ‘शरद पवारांना जर नातवाला खासदार करायचं होतं तर त्यांना बारामतीतून उमेदवारी का नाही दिली ? पवारांचं नातवापेक्षा लेकीवर जास्त प्रेम आहे त्यामुळे त्यांनी पार्थ पवारांना मावळमध्ये ढकलून दिले आहे’ अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे यांच्यावरही टीका केली होती. तसेच स्वभिमानिकडून विशाल पाटील यांना सांगलीची उमेदवारी मिळाल्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेस संपत चालली आहे अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली होती.