पुणे : ‘भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेला पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
‘टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये’ असा इशारा अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला आहे.
यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अजित पवार उपलब्ध नाहीत असं मी म्हणालो, त्या दिवशी ते खरोखरंच २४ तास उपलब्ध नव्हते. त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू नव्हता. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वच प्रकारच्या कार्यक्षमतेबद्दल मी बोलतोय. मात्र ते आता केवळ व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना उपलब्ध होत आहेत. त्यांनी तसे न करता आता लोकांना भेटले पाहिजे. लोकांना दिलाशाची गरज आहे’. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तर, ‘अजित पवार यांच्या इफिशियन्सीबद्दल मला कौतुकच आहे. काही मंत्र्यांचा दिवस सकाळी ११ शिवाय उगवत नाही, पण ते सात वाजता मंत्रालयात असतात हे खरं आहे. मात्र, त्यांच्यावर कामाचा ताण येत असेल तर त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला दुसरा पालकमंत्री देऊन मुंबईतून राज्याचा कारभार पाहावा, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील
महत्वाच्या बातम्या
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन