आमच्या पक्षात फसवणूक, बेरकेपणा, पाठीत खंजीर खुपसणे या गोष्टी नाही – चंद्रकांत पाटील

chandrkant patil sharad pawar

पुणे : ‘भाजपच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका, हे नाराज ते नाराज, ही भाजपची मानसिकता आहे. पाच वर्षं सत्तेत असताना भाजपने शिवसेनेवर अन्याय करण्याची भूमिका घेतली होती. असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठकीसाठी पाटील पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला होता,

यालाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जयंत पाटील म्हणतात भाजपला गांभीर्याने घेऊ नका. जनतेनं तुम्हाला गांभीर्याने घेतलं नाही म्हणून विधानसभेला तुमच्या ५४ आल्या आणि आमच्या १०५ आल्या. आमच्या पक्षात फसवणूक, बेरकेपणा, पाठीत खंजीर खुपसणे या गोष्टी नाहीत असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं, क्रॉस सबसिडी म्हणजे काय ते सांगावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलय. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली म्हणजे माझं काम भागलं अशा पद्धतीने मुख्यमंत्री काम करत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असा दावा त्यांनी केला आहे. आमचं सरकार जाणार नाही असं म्हणता मग बोंबलता तरी कशाला ? असा टोला पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या