मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं – चंद्रकांत पाटील

udhav thackeray chandrkant patil

पुणे : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

यावरून आता राजकारण पेटलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं, क्रॉस सबसिडी म्हणजे काय ते सांगावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलय. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली म्हणजे माझं काम भागलं अशा पद्धतीने मुख्यमंत्री काम करत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असा दावा त्यांनी केला आहे. आमचं सरकार जाणार नाही असं म्हणता मग बोंबलता तरी कशाला ? असा टोला पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP